home page top 1

पुण्यातील माळीणची पुनरावृत्ती ? कोल्हापूरात डोंगराला ‘भेगा’, ग्रामस्थांमध्ये ‘भीती’चे वातावरण

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली, कोल्हापूरला महापूराचा मोठा फटका बसला आहे यामुळे अनेक पूरग्रस्ताचे संसार उद्धवस्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर अनेकांचे बळी गेले आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. आजरा आणि भूदरगड या तालुक्यांच्या सीमेवरील डोंगर भागाच्या गावातील ग्रामस्थ सध्या भीतीच्या छायेत आहेत. या भागात असलेल्या डोंगराला मोठाल्या भेगा पडल्या आहेत. त्याकारणाने माळीणची पुनरावृत्ती होण्याची भीतीदायक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या पावसानं थोडी विश्रांती घेतल्यानं पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतू अनेक भागात अजूनही भीतीदायक परिस्थिती कायम आहे. आजरा-भुदरगड सीमेवरील डोंगराला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तेथील वाड्यांमधील ग्रामस्थ यामुळे भीतीच्या वातावरणात जगत आहेत. वझरे आणि पेरणोली दरम्यानच्या डोंगराला मोठी भेग पडल्याचे दोन दिवसांपूर्वीच निदर्शनास आले. शेळ्या आणि मेंढ्या चारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना हे लक्षात आले यामुळे ग्रामस्थ घाबरले आहेत.

सडा डोंगराला पडलेली भेग अंदाजे दीड किलोमीटर लांब आहे. त्यामुळे डोंगर कोसळला तर या भीतीनं पेरणोलीपैकी धनगरवाडा आणि खोतवाडीतील ग्रामस्थांना समस्यात आहेत. माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती असून, भूगर्भ आणि भूजलतज्ज्ञ या भागाचे सर्वेक्षण करणार आहेत.

कोल्हापुरात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे बळी गेले आहेत. संसार उघड्यावर आले आहेत. राज्य सरकार, नौदल, एनडीआरएफसह अनेक सामाजिक संस्था पूरग्रस्तांच्या मदतीना हात दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like