कोल्हापूर : लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

खरेदी केलेल्या प्लॉटची ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या शिंगणापूरच्या (ता. करवीर) तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठ्याने रविवारी (दि.२४) लाचेची मागणी केली होती. या लाचखोर तलाठ्याविरुद्ध आज (शुक्रवार) दुपारी बाराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0794719T8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20aa453b-7b80-11e8-8964-d9a4cbf37420′]

संतोष रामचंद्र कुलकर्णी (तलाठी, शिंगणापूर, ता. करवीर जि.कोल्हापूर) असे गुन्हा दखल करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका इसमाने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी शिंगणापूर येथे आईच्या नावे प्लॉट खरेदी केला आहे. प्लॉटच्या ७/१२ उताऱ्यावर आईचे नाव नोंदवून उतारा देण्यासाठी तलाठी कुलकर्णी याने दहा हजारांची मागणी केली. लाचमागीतल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. तलाठ्याने तक्रारदारकडून लाच मागितली परंतु ती स्विकारली नाही. एसीबीच्या पोलिसांनी याची शहानिशा केली असता तलाठी कुलकर्णी याने लाच मागितल्याचे समोर आले. त्यानुसार कुलकर्णी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शिंगणापूर पोलीस करीत आहेत.