कोल्हापूरातील 239 गावांमधून 1 लाख 11 हजार नागरिकांचे ‘स्थलांतर’, नदीच्या पाणी पातळीत ‘घट’

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – मागील १५ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असून कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या सर्व पूरग्रस्त नागरिकांना प्रशासनाने बाहेर काढले असून अजूनही मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार २३९ गावांमधून जवळपास १ लाख ११ हजार नागरिकांना या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गावांमधील जवळपास १०० टक्के कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात अजूनही बचावकार्य सुरूच आहे. सध्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांची घट झाली असून यामुळे मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांना बचावकार्यात यामुळे मदत मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोळ तालुक्यात ३० बोटी पाठविण्यात आल्याअसून अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य सुरु असल्याचा आढावा देखील घेतला जात आहे. त्याचबरोबर पुरामुळे नुकसान झालेल्या घरांचे, गावांचे तसेच शेतीचे पंचनामे करण्यासाठी पथके तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणी ओसरल्यानंतर वीजजोडणीचे देखील काम हाती घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अतिरिक्त वस्तूंच्या पुरवठ्याविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, आमच्याकडे ६९ हजार लिटर पेट्रोल, ३१ हजार लीटर डिझेलचा राखीव साठा असून बचावकार्यात लागणाऱ्या वाहनांसाठी याचा वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर पाणी कमी होताच पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा तात्काळ करण्याच्या सूचना देखील दिल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्यातील ४०० पाणी पुरवठा योजना बंद असून त्यादेखील लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

दरम्यान, या सगळ्या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी या पुराची हवाई पाहणी केली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात नागरिकांना मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –