कोल्हापूर महापुरात बुडाले, लष्कराचे मदत कार्य सुरु, पुणे-बंगलुरु महामार्ग अजूनही बंद

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे कोल्हापूराला इतिहासातील सर्वात मोठ्या महापुराचा सामाना करावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातही पुराचे पाणी शिरले असून हजारो नागरिक पाण्यात अडकले आहे. त्यांची मदतीसाठी एनडीआरएफची टीम मंगळवारी रात्री कोल्हापूरात पोहचली आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याने लष्कराला पाचारण केले असून त्यांनी मदत कार्य सुरु केले आहे.

पुणे -बंगलुरु राष्ट्रीय महामार्ग अद्यापही पाणी असल्याने हा मार्ग तब्बल ३० तासापासून अजूनही बंद आहे. नौदलाची टीम कोल्हापूरात आताच दाखल झाली आहे. या महापुरामुळे तीन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने पाणीपुरवठा बंद पडला आहे. एका बाजूला पाणीच पाणी तर दुसरीकडे पिण्यासाठी पाणी नाही, अशी स्थिती निर्माण झाली असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला तर पेट्रोलची टंचाई निर्माण झाली आहे. दुधाचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, कासारी, दुधगंगा, तुळशी या धरणातून मोठ्या प्रमाणावर नद्यांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पंचगंगेला महापूर आला आहे. पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी आजवर ५० फुटापर्यंत गेली होती. पण, काल तिने थेट ५५ फुटाची पातळी गाठून एक इतिहास घडविला आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक शहरात पाणी शिरले आहे.

कोल्हापूर शहरातील पाऊस कमी झाला असला तरी पश्चिम भागातील घाट परिसरात अजूनही जोरदार पाऊस पडत असून राधानगरी येथे गेल्या २४ तासात २२० मिमी, दुधगंगा १४६ मिमी, तुळशी ३२४ मिमी, कासारी १३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अजूनही घाट परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यात पुढील तीन दिवस घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने त्यामुळे कोल्हापूरातील महापूराची परिस्थिती सुधारण्याची कमी आहे.

शहरातील ४ ते ५ हॉस्पिटल पाण्याने वेढले गेले असून काही ठिकाणचा वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. येथील रुग्णांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. रुग्णवाहिका अक्षरक्ष पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरुन रुग्णांना सुरक्षितपणे नेण्याचा प्रयत्न करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like