दादांच्या बॉडीगार्ड्सची दादागिरी, महापौरांना धक्काबुक्की

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

कोल्हापूरातील मानाच्या गणपतीचे पूजन करण्यासाठी आलेल्या महापौरांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार आज (रविवार) घडला. महापौरांना कर्यकर्त्यांकडून धक्काबूक्की झाली नाही तर महसूलमंत्री यांच्या बॉडीगार्डसनी त्यांना धक्का बुक्की केली. त्यामुळे दादांच्या बॉडीगार्डसच्या दादागिरीमुळे महापौर चांगल्याच संतापल्या आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff908c14-bef8-11e8-ab4e-05982476cc2b’]

कोल्हापूरच्या मानाच्या तुकाराम माळी गणपतीचे पूजन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. याच दरम्यान दादांच्या बॉडीगार्डसनी महापौरांना धक्काबुक्की केली. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असून या घटनेचा निषेध केला जात आहे. तसेच इथून पुढे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे किंवा नाही ते ठरवावे लागेल अशी प्रतिक्रीया महापौरांनी दिली आहे.

पुण्यात ‘स्वाइन फ्लू’ने आतापर्यंत २० जणांचा मृत्यू,  रूग्णांची संख्या १०९ वर 

दादांच्या बॉडीगार्डसने महापौरांनाच धक्काबुक्की केली नाही तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींना देखील धक्काबुक्की केली. तुकाराम माळी गणपती विसर्जन मिरवणूकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना आणि पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे दादांच्या दादागिरीची चर्चा सर्वत्र होती.

दरम्यान, या मिरवणुकीच्या सुरुवातीला कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ढोल वाजवला. दरवर्षी चंद्रकांत पाटील या मिरवणुकीत सहभागी होऊन, ढोल ताशे वाजवतात.

जीपीएस सिस्टीमद्वारे मिरवणूकीवर वॉच : पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम

लाडक्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज विसर्जन केलं जाणार आहे. मुंबईसह राज्यभरात आज गणेश विसर्जनाचा उत्साह आहे. डॉल्बीवर बंदी असल्यामुळे काही ठिकाणी नाराजी आहे, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने लेझिम, ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b5788ac7-bef9-11e8-b331-19d7f3c654b0′]

विसर्जन मिरवणूकीदरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मार्गावरील गणेश मंडळांना वेळोवेळी पोलिसांकडून सुचना करण्यात येत आहेत. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी सर्व अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी सकाळपासूनच रस्त्यावर आहेत. सर्व खबरदारीचे उपाय करण्यात आले असून गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ae618cc7-befa-11e8-a155-6130351eb284′]