पवार साहेबांनी आदेश दिला तर सतेज पाटलांची भेट घेईल : मुन्ना महाडिक 

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाईन – माणूस सगळ्या गोष्टी विसरेल मात्र निवडणुकीच्या आखाड्यात झालेला पराभव मात्र कधीच विसरला जाऊ शकत नाही. धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना सतेज पाटील यांनी गत लोकसभा निवडणुकीला मदत केली मात्र सहा महिन्याने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला भाजप मधून चुलत भाऊ उमेदवारी करत असल्याने सतेज पाटलांना विरोध करण्यासाठी मुन्ना महाडिकांनी काहीच पहिले नाही.स्वतःच्या भावाचा प्रचार पडद्या आडून सांभाळून सतेज पाटलांचा पराभव घडवून आणला. त्याचाच राग मनात धरून सतेज पाटील यांनी आघाडी झाली तरी धनंजय महाडिकांना मदत करायची नाही असा विचार मनोमन केला आहे तोच विचार मुन्ना महाडिकांच्या मनात धास्ती निर्माण करू लागला आहे.

सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात मागील काही दिवसापासून निर्माण झालेले वितुष्ट आता सर्वत्र प्रसिद्धीस आले आहे. आता सतेज पाटलांच्या काँग्रेसने आणि मुन्ना महाडिकांच्या राष्ट्रवादीने आघाडी करून लढायचे ठरवले आहे. मात्र मुन्ना महाडिकांची आपण कसलीही मदत करायची नाही असा मनसुबा सतेज पाटलांनी बांधलेला आहे. अशात सतेज पाटलांची मदत घेतल्या शिवाय लोकसभेचे मैदान जिंकणे तितकेशे शक्यच नाही याची जाणीव धनंजय महाडिकांना आहे.

नेमके काय म्हणाले धनंजय महाडिक 
पवार साहेबांनी आदेश दिले तर मी सतेज पाटील यांना भेटेल. ते माझे चांगले मित्र आहेत. सतेज पाटील आघाडीचा निर्णय मान्य करतील लोकसभेच्या निवडणुकी पर्यंत त्यांच्या मनातील वितुष्ट नाहीसे होईल. गेल्या वेळी आघाडी झाली असती तर मी सतेज पाटलांच्या बाजूने प्रचारात उतरलो असतो. मात्र गत निवडणुकीत ते त्यांच्या कर्मामुळे पराभूत झाले आहे असे धनंजय महाडिक म्हणाले आहेत.