Kolhapur Megholi Irrigation Project | कोल्हापुरातील मेघोली प्रकल्प फुटला; महिलेचा मृत्यू, अनेक जनावरे दगावली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur Megholi Irrigation Project | ओढ दिलेल्या पावसाने पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या (Kolhapur Megholi Irrigation Project) भिंतीला गळती लागली होती. मध्यरात्री प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागून अखेर बंधारा फुटला. पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर शेकडो एकर शेतजमीन वाहून गेली आहे. तर अनेक जनावरे दगावली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधाऱ्याचे आउटलेट आहे त्या शेजारून बंधारा फुटला आहे. बंधार्‍यातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.गळतीमुळे संपूर्ण रात्रभर ग्रामस्थांनी जागून काढली.

दरम्यान, बंधारा फुटल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातून १२ नद्या वाहतात. त्यामुळे विविध लघु पाटबंधारे सुद्धा बांधण्यात आले आहेत.काही वर्षांपूर्वीच मेघोली धरण बांधण्यात आल होत. त्याला गळती लागल्याची माहिती पूर्वीच प्रशासनाला दिली गेली होती.

हे देखील वाचा

Modi Government | खुशखबर ! आता सरकार मजूरांना दर महिना देणार 3,000 रुपये पेन्शन! ‘या’ पध्दतीनं करा रजिस्ट्रेशन; जाणून घ्या

Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Kolhapur Megholi Irrigation Project | leakage in megholi irrigation project a woman washed away in water

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update