कोल्हापुरातून मुंबईला 6 तासात पोहचता येणार !

पोलिसनामा ऑनलाईन, कोल्हापूर – यंदाच्या अर्थ संकल्पामध्ये मेट्रोसाठी साडे पाच हजार कोटीची तरतूद केलीय. तसेच येत्या काळात देशातील बहुतेक महत्वाच्या मार्गावर रेल्वे विजेवर धावणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर-मिरज-पुणे- मुंबईचा प्रवास अधिक जलद होणार आहे.

कोल्हापूर रेल्वे कोकण रेल्वेला जोडण्यासाठी निधीचे काय? याविषयी तुर्त प्रश्न चिन्ह कायम आहे. मात्र, त्यासाठीही निधीची उपलब्धता होईल अशी अपेक्षा आहे, असे मत रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियानी यांनी व्यक्त केलंय.

याबाबत रेल्वे प्रवासी निखिल शहा म्हणाले,कोल्हापूर – मिरज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालंय. चाचणी यशस्वी झालीय. तसेच मिरजेवरून पुणे पर्यंतचे विद्युत मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. अशा वेळी देशभरातील रेल्वे वीजेवर धावण्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अन्य मार्गावरही विद्युतमार्ग होतील, त्यामुळे येणार्‍या काळात कोल्हापूर-मिरज गाडी विजेवर धावू शकतील, असे घडल्यास कोल्हापूरातून मुंबईला अवघ्या 6 तासात पोहचता येणे शक्य होणार आहे.