कोल्हापूर महापालिकेतील ‘किळस’वाणा प्रकार ! 2 नगरसेवकांनी घेतलं चक्क महिलांसमोरच ‘खुल्लमखुल्ला’ चुंबन (व्हिडीओ)

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सतत वेगवेगळ्या कारणामुळे वादग्रस्त ठरणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणामुळे गाजली. महापालिकेची सभा सुरु असताना भर सभागृहात विरोधी गटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याचे चुंबन घेतल्यामुळे सर्वजण अवाक् झाले. हे दृष्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

https://twitter.com/AkshayShitole21/status/1222834987889594368

कोल्हापूर महापालिकेत पालिकेचं नियमित काम सुरु होतं. तेव्हाच चेष्टा मस्करीमधून ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे या नगरसेवकाने काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या गालाचे चुंबन घेतले. महापालिकेच्या सभागृहात आज महापौर राजीनाम्याची विशेष सभा बोलवण्यात आली होती. त्यावेळी विरोधी गट असलेल्या ताराराणी आघाडीचे नगरसेवक भोपळे हे थेट सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यांनी शेजारी बसलेले काँग्रेसचे नगरसेवक देशमुख यांचे चुंबन घेतले.

महापालिकेत घडलेल्या या प्रकराची नगरसेवकांमध्ये मोठी चर्चा सुरु झाली. दरम्यान, महापालिकेत महिला नगरसेवकांच्या समोरच हा किळसवाणा प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक ठिकाणी जबाबदारपणे वर्तन करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र, कोल्हापूरमध्ये नगरसेवकांनी थेट महापालिकेतच केलेल्या या कृत्यावर टीका करण्यात येत आहे.