Kolhapur News | अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी काॅल; कोल्हापुरात मोठी खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Kolhapur News | मागील दिड वर्षापासून बंद असलेली मंदिरे आज (गुरुवारी) खुली झाली आहे. नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशा मंदिरे खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. अशातच आज कोल्हापुरातील (Kolhapur News) देवस्थान अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) बॉम्ब (Bomb) ठेवल्याचा एक निनावी फोन आला आहे. या माहितीमुळे कोल्हापुर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन येताच कोल्हापूर पोलिसांसह (Kolhapur police) बॉम्बशोधक पथकाची धावपळ उडाली आहे. तात्काळ बॉम्बशोधक पथक अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहे. मंदिराच्या सर्व ठिकाणी बॉम्ब आहे का? याचा शोध घेतला जात आहे. असा फोन आल्याने मंदिरातील भाविकांचे दर्शन तात्काळ थांबवण्यात आले आहे.

दरम्यान, पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. शेवटी हा काॅल खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

 

Web Title : Kolhapur News | anonymous phone call about the bomb placed at the ambabai temple in kolhapur city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Osmanabad Crime | संतापजनक ! जात पंचायतीने केले ‘हे’ घृणास्पद कृत्य; संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ

Mumbai Crime | अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडीसोबत डिलिव्हरी बॉयचं विकृत कृत्य; मुंबईतील संतापजनक घटना

Jayant Patil | आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल (व्हिडीओ)