Kolhapur News | कोल्हापूर जिल्ह्यात जादा व्याजाच्या आमिषाने कोट्यवधीची गुंतवणूक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Kolhapur News | जिल्ह्यात अधिक व्याजाच्या आमिषाने सामान्यांच्या ठेवी गोळा करणाऱ्या संस्थांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या संस्थांचे व्यवहार संशयास्पद असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाही तर जादा व्याजाच्या आमिषा पोटी गोळा झालेली कोट्यवधीची गुंतवणूक अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Kolhapur News)

 

गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यात जादा व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवी गोळा करण्याचा सुरु उद्योग आहे.
या योजनेच्या ठेवी गोळा करण्यासाठी मोठा पगार, आकर्षक लाभाचे प्रलोभन दाखवून तरूणांना जाळ्यात ओढले जाते.
त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेऊन ही लबाडाची टोळी माया जमवत असल्याचे समजते. ही टोळी ठेवी गोळा करताना नागरिकांना परव्या संदर्भातले विविध आमिषे दाखवत आहेत.
त्यातीलच एक म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणुकी आधारे महिन्याला ८ टक्के या दराने वार्षिक ९८ टक्क्यांचा परतावा दिला जाईल, असे सांगून या ठेवी गोळा करत आहे.
इतकच नाही तर लोकांचा विश्वास बसण्यासाठी काही महिंन्याचे व्याजही धनादेशाव्दारे देत आहेत.
हे धनादेश बाऊन्स होऊ नये म्हणून विशेष खबरदारही या टोळीकडून घेण्यात येत आहे.

 

सर्वसामान्य नागरिक नव्हे, तर समाजातील प्रतिष्ठित समजले जाणारे डॉक्टर्स, वकील, शिक्षक, प्राध्यापकही या आमिषाला बळी पडले आहेत.
यातील काही जणांनी तर आपले व्यवसाय सोडून योजनेला गुंतवणूकदार मिळविण्याचा धंदा सुरू केला आहे आणि योजनेचे विपणन व्यवस्थेतील कर्मचार्‍यांची मर्सिडीससारख्या आलिशान गाड्यांतून फिरण्यापर्यंतही मजल गेली आहे.

कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) दबक्या आवाजात याबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.
पण आपल्या शासन व्यवस्थेला तक्रार असल्याशिवाय काही करता येत नाही.
मोठी गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार निराळ्याच चौकशीच्या भीतीने फिर्याद देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या लबाडांचे फावले आहे.
एकूणच यावर जरब बसवण्यासाठी पुढाकार कोण घेणार हा खरा महत्वाचा प्रश्न आहे.
दरम्यान, या प्रकारामध्ये काही अतिदक्ष समजासेवकांनी लक्ष घातले. मात्र, लबाडांच्या म्होरक्याला जाऊन भेटल्यानंतर या समाजसेवकांचे हात ओले झाल्याने तेही तेथेच थांबले.

 

अलीकडे कमी कष्ट पण पैसे जादा मिळेल अशा ठिकाणी नागरिकांचा ओढा जास्त असतो. हे वेळोवेळी दिसून आले आहे.
जादा पैशाचा मोहापायी अनेक जण त्याकडे खेचले जातात.
मग अशा प्रकारातून होणाऱ्या फसवणूकीबाबत कितीही जनजागृती केली तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.
कोल्हापूरात अधिक परताव्याच्या मोहापायी व्यक्तीगत ४०-५० लाखांपर्यंत गुंतवणूक केली आहे.
याचा एकत्रित आकडा कोट्यवधीचा घरात आहे. काहींनी तर चांगली नोकरी सोडून नसत्या उद्योगाच्या मागे लागले आहे.
शासनाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने लबाडांची गंगाजळी दिवसेंदिवस मोठी होत आहे. त्यामुळे आता यावर कारवाई करणार कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

 

Web Title : Kolhapur News | Billions invested in Kolhapur district with the lure of extra interest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ICC T20 Rankings | बाबर आझम अव्वल स्थानी तर कोहली टॉप 10 मधून OUT

Kangana Ranaut | वारंवार होणाऱ्या FIR वर अभिनेत्री कंगना रणावतचं प्रत्युत्तर

Aarya-2 Motion Poster | ‘आर्या 2’चं मोशन पोस्टर रिलीज, सुस्मिता सेनचं क्रूर रूप पाहून तुम्हीही व्हाल थक्क..!