Kolhapur News | कारने घेतला अचानक पेट ! कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हॉटेल व्यावसायिकाचा आगीत होरपळून मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur News | येथील कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील (Kolhapur News) बोरपाडळे घाटामध्ये (Borpadle Ghat) कारने अचानक पेट घेतला त्यात एका हाॅटेल व्यावसायिकाचा (Hotelier) होरपळून मृत्यु (Died) झाला. ही दुर्घटना गुरूवारी (23 सप्टेंबर) रोजी घडली आहे. प्रत्यक्ष महामार्गावर ही घटना घडल्याने तासभर वाहतुक कोंडी झाली होती. दरम्यान, अग्निशमन दलाने (Fire brigade) त्तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग निंयत्रणात आणली.

याबाबत माहिती अशी, अभिजित पांडुरंग ठाणेकर (Abhijit Pandurang Thanekar) (वय, 32 रा.पिंपळगाव झुलपेवाडी ता. आजरा) असं मृत हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे. मृत अभिजित हे गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास आपल्या कारने पन्हाळा तालुक्यातील नावली येथील आपल्या धाब्याच्या दिशेने जात होते. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील बोरपाडळे घाटामध्ये त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. यावेळी आगीनं मोठा भडका घेतला. त्यावेळी त्यांना गाडीमधून बाहेरही येता येत नव्हते. या दुर्दैवी घटनेत अभिजित यांचा जागीच होरपळून मृत्यू (Died) झाला आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने त्तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग निंयत्रणात (Kolhapur News) आणली.

दरम्यान, आपली कार गरम होतं असल्याची माहिती अभिजित यांना आधीपासूनच होती.
याबाबत अभिजित यांनी आपल्या मित्राला फोन करून कार गरम होतं असल्याची माहिती दिली होती.
धोका असतानाही अभिजित यांनी आपल्या कारमधून प्रवास केला आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तर एअरबॅगचा स्फोट झाल्याने अभिजित कारमध्ये अडकले आणि यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून (Police) व्यक्त होतोय.

हे देखील वाचा

EPF Account सोबत नवीन बँक खाते लिंक करणे खुपच सोपे, फॉलो करा ‘ही’ सोपी स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Manohar Mama Bhosale | छातीत दुखू लागल्याने मनोहरमामा भोसले सोलापूर रुग्णालयात दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Kolhapur News | car catch fire in borpadle ghat kolhapur ratnagiri highway hotel businessman died in accident police on the spot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update