Kolhapur News | दुर्देवी ! ओढ्याच्या पुरातून जात असताना दुचाकी कलंडली, हवाई दलातील जवान गेला वाहून

कोल्हापूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Kolhapur News । कोल्हापूरमधील (Kolhapur) चंदगड तालुक्यातील कडलगे-ढोलगरवाडी या दोन गावाजवळ असणाऱ्या ओढ्याला पावसाने पूर (Flood) आला आहे. या आलेल्या पुरातून दुचाकीवरून (Two-wheeler) जाताना भारतीय हवाई दलातील जवान वाहून गेला आहे. ही दुर्दवी घटना घडली आहे. अभिषेक संभाजी पाटील (Abhishek Sambhaji Patil) (वय, 26, रा. कोल्हापूर ) असं त्या पाण्यातून वाहून गेलेल्या जवानाचं नाव आहे. तसेच, त्याच दुचाकीवरून प्रवास करणारा शशिकांत पाटील (Shashikant Patil) मात्र सुदैवाने बचावला आहे.

सैन्यदलात दाखल होऊन भारतमातेची सेवा करण्याचे तीव्र स्वप्न अभिषेकने उराशी बाळगले होते.
त्यानुसार भारतीय हवाई दलात जॉईन होऊन अभिषेक गेल्या 2 वर्षांपासून सेवा बजावत आहे.
तो सुट्टीवर गावी आला होता. परंतु, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच तो पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,अभिषेक पाटील (Abhishek Sambhaji Patil) हा जवान आपल्या मित्राबरोबर काही कामानिमित्त ढोलगरवाडीला गेला होता.
तेथून आपल्या नागरदळे गावी परतत असताना कडलगे गावालगत ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने.
त्याची स्प्लेंडर दुचाकी (Splendor bike) पाण्यात जाताच पाण्याच्या जोरात प्रवाहाच्या वेगामुळे कडेला कलंडली.
यात अभिषेक पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला.

त्यावेळी जवान अभिषेकला धरण्याचा प्रयत्न मित्र शशिकांतने केला, मात्र पाण्याच्या जोरात गतीमुळे ते शक्य झालं नाही.
पाण्याबाहेर असणाऱ्या काही युवकानी शशिकांत आणि त्यांच्या बाईकला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
या दरम्यान, या घटनेची माहिती समजताच ओढ्या ठिकाणी शोध मोहीम सुरु झालीय.
परत अजून त्याचा शोध लागला नाही. कोवाड पोलिस औट पोष्टचे पोलीस कॉन्स्टेबल कुशाल शिंदे (Police Constable Kushal Shinde) यानी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम राबवली.
तसेच, आमदार राजेश पाटील (MLA Rajesh Patil) यानी या घटनेबाबत प्रशासनास सूचना केल्या आहेत.

Web Title : kolhapur news | kolhapur indian air force soldier flown away in flood water

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rain in Maharashtra | तुळशी धरण क्षेत्रात राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा विक्रमी 895 मिमी पाऊस; महाबळेश्वरात 2 दिवसात 980 मिमी

Fact Check Video | पाण्यातून अचानक जमीन वर येण्याचे काय आहे रहस्य, जाणून घ्या वायरल व्हिडिओचे ‘सत्य’

Covid-19 Vaccine | कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर गंभीर साईड इफेक्टचे सरकारने सांगितले कारण; जाणून घ्या