Kolhapur News | 2 हजाराची लाच घेताना दुय्यम निबंधक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर न्यूज (Kolhapur News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) –  बक्षीसपत्राचा दस्त देण्यासाठी 2 हजाराची लाच (Bribe) स्वीकारतांना शिरोळ येथील येथील दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti corruption bureau) सापळा रचून रंगेहाथ पकडले. मंगळवारी (दि. 22) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास एसीबीने (ACB) ही कारवाई केली आहे. Kolhapur News | secondary registrar of Shirol taluka caught taking bribe of Rs 2000

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

प्रमोद नेताजीराव साळुंखे (वय 55) असे गुन्हा दाखल झालेल्या लाचखोर दुय्यम निबंधकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांनी 9 जून रोजी शिरोळ दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकाराचे बक्षीसपत्र केले होते.
याची संबंधित कार्यालयात रीतसर नोंदणी झाली आहे.
तक्रारदारांनी या बक्षीसपत्राचा दस्त, दुय्यम निबंधकांकडे मागितला होता.
मात्र दस्त देण्यासाठी साळुंखेंनी तक्रारदाराकडे 2 हजार रुपये मागितले होते.
याबाबत तक्रारदारांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti corruption bureau) तक्रार दिली होती.
त्यानुसार मंगळवारी (दि. 22) दुय्यम निबंधक कार्यालयात साळुंखेे याच्याकडे लाच मागणीची पडताळणी केली असता पक्षकाराचा नोंदणी झालेल्या बक्षीसपत्राच्या दस्तासाठी 2 हजार घेतल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे साळुंखे याच्याविरुद्ध रात्री उशिरा शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, पो. कॉ. शरद पोरे, पोलिस नाईक विकास माने, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर, सूरज अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : Kolhapur News | secondary registrar of Shirol taluka caught taking bribe of Rs 2000

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार