Kolhapur News | सोशल मीडियावर झळकतेय कोल्हापूरची चंद्रा…! अमृता खानविलकरने व्हिडिओ शेअर करत केले कौतुक

कोल्हापूर : Kolhapur News | महाराष्ट्राच्या लोककलेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लावणी. या लावण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची आणि लोककलेला जगभरात वेगळी ओळख आहे. अनेक चित्रपटांमध्ये देखील लावणी दाखवली जाते. अनेक संगीतकारांनी आपल्या संगीताच्या जादूने लावणी बनवली आहे, अनेकांना त्यावर ठेके धरायला लावले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हीचा चंद्रमुखी चित्रपट (Chandramukhi Movie) येऊन गेला,. त्या चित्रपटातील चंद्रा या गाण्याने अनेकांना थिरकायला लावले, त्यातच आता पुन्हा एका हे गाणे चर्चेत आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनी चंद्रा या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमृता खानविलकरला लाजवेल असा डान्स या विद्यार्थ्यांनीने केला आहे, त्याची सद्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. (Kolhapur News)

कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनुस्करा या गावात राहणारी हर्षदा कांबळे हिने या गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. घरापासून तीन ते चार किलोमीटरची पायपीट करून हर्षदा ही जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी येते आहे. तिला डान्स ची खूप आवड असून शाळेतच प्रत्येक कार्यक्रमात ती उत्साहाने सहभगी होते. महिला दिनानिमित्त तिच्या शाळेत कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या कार्यक्रमातच हर्षदा ” चंद्रा” या गाण्यावर डान्स केला. त्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. कुठलेही प्रशिक्षण न घेता एका टेक मध्ये तिने नृत्य करून दाखवल्याने तिचे विशेष कौतुक देखील होत आहे. (Kolhapur News )

तिच्या डान्सचा व्हिडिओ त्याच शाळेतील शिक्षकांनी व्हायरल केला असून. अल्पावधीतच त्याला मोठी पसंती मिळाली आहे. एवढेच नाही तर खुद्द अमृता खानविलकर हिने देखील तिच्या सोशल अकाऊंटवरून शेरा करत ” चिमुकली चंद्रा”, असे कॅप्शन त्याला दिले आहे. तसेच तिचे तोंड भरून कौतुक ही केलं असून तिच्या व्हिडिओ ला नागरिकांनी देखील जोरदार प्रतिसाद देत चांगले कमेंट्स दिले आहेत.

Web Title :- Kolhapur News | The moon of Kolhapur is visible on social media…! Amrita Khanwilkar shared the video and appreciated it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

Nitin Gadkari | नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन, जयेश पुजारीच्या नावाने धमकी; 10 कोटींची खंडणी मागितली, पोलिसांकडून तपास सुरु

Maharashtra Local Body Election | ‘तारीख पे तारीख’, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पुन्हा पुढे ढकलली