Kolhapur News | ट्रक उलटला अन ग्रामस्थांची गर्दी झाली; ‘मदती’ला नव्हे ‘लुटालुटी’ला

कोल्हापूर : Kolhapur News | कोल्हापूर – राधानगरी रोडवरील (Kolhapur – Radhanagari Road) पिरवाडी जवळ एका वळणावर शितपेय घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात (Accident) ट्रकमधील दोघे गंभीर जखमी झाले. मात्र ट्रक उलटल्याचे पाहून परिसरातील ग्रामस्थांनी मदत करण्याऐवजी ट्रकमधील शितपेयावर डल्ला मारण्यास सुरुवात केली. ट्रकमधील शितपेयांचे बॉक्स (Cold Drink Box) नेण्यासाठी परिसरातील लोकांची तसेच रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍या वाहनचालकांची झुंबड उडाली होती. (Kolhapur News)

गोव्याहून कोल्हापूरकडे शितपेय घेऊन जाणारा ट्रक करवीर तालुक्यातील पिरवाडी जवळ शनिवारी पहाटे एका वळणावर उलटला. या अपघातात ट्रकमधील चालक व क्लिनर हे दोघे गंभीर जखमी झाले.
त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उलटलेला ट्रक रस्त्याच्या कडेला होता.
तेथे कोणी नसल्याचे पाहून परिसरातील लोकांनी गर्दी केली.
उलटलेल्या ट्रकच्या खालच्या बाजूला जाऊन लोक आतील शितपेयांचे मोठे मोठे बॉक्स बाहेर काढू लागले. (Kolhapur News)

एका दोघांनी सुरुवात केल्यावर शितपेयांचे बॉक्स पळून देण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली.
अनेकांनी गाड्या घेऊन येऊन त्यात शितपेयांचे बॉक्स भरुन घेऊन गेले.
दुचाकीस्वारांनी मधल्या जागेत मोठे बॉक्स ठेवून घेऊन जाताना दिसून येत होते.
संपूर्ण रस्त्यावर शीतपेयांच्या हिरव्या बाटल्या घेऊन जाणारे लोक दिसत होते.
काही वेळातच संपूर्ण ट्रक जवळपास पूर्ण ट्रक लोकांनी लुटून नेला. त्यांना अडवायला अथवा बोलायला कोणी नव्हते.
अनेक श्रीमंतही आपल्या कारमध्ये बॉक्सचे बॉक्स घेऊन जाताना दिसून आले.

Web Title :- Kolhapur News | The truck overturned and there was a crowd of villagers; Not to ‘help’ but to ‘robbery’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dipa Karmakar | भारताच्या ‘या’ महिला जिम्नॅस्टपटूचे 21 महिन्यांसाठी निलंबन; उत्तेजक द्रव्य चाचणीत आढळली दोषी

Nagpur ACB Trap on PSI | आरोपीला अटक न करण्यासाठी 35 हजार रुपये लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात