Homeशहरकोल्हापूरKolhapur News | धक्कादायक ! मॅच पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू  

Kolhapur News | धक्कादायक ! मॅच पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाचा क्रिकेटचा सामना पाहत असताना अचानक मैदानातच मृत्यू झाला. त्या व्यक्तीला सामना पाहत असताना अचानक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि त्यातच या व्यक्तीचा मृत्यू झाला. यादरम्यान याच्या आजूबाजूंच्या व्यक्तींनी त्याला त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं पण त्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे क्रिकेट प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kolhapur News)

 

रविराज कांबळे (Raviraj Kamble) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो 34 वर्षांचा होता. हाती आलेल्या माहितीनुसार, करवीर (Kolhapur News) तालुक्यातील वरणगे पाडळी याठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मृत रविराज कांबळे हा देखील याठिकाणी सामने खेळण्यासाठी गेला होता. दरम्यान मृत रविराज हा आपल्या काही मित्रांसोबत दुसऱ्या संघाची मॅच पाहत बसला होता. या दरम्यान अचानक रविराजला चक्कर आली आणि तो खाली कोसळला.

यानंतर रविराजच्या मित्रांनी त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण उपचार करण्यापूर्वीच वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्याने रविराजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. रविराजचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती करवीर पोलिसांना (Karveer Police Station) देण्यात आली. येणार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे. मृत रविराज यांच्या माघारी पत्नी, दीड वर्षांची मुलगी, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

 

Web Title :- Kolhapur News | young boy died by heart attack while watching match in cricket ground kolhapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पती-पत्नीतील भांडणात रस्त्यावरील वाहनांची केली तोडफोड; पुण्याच्या बोपोडीत जावयाचा ‘धिंगाणा’

Pune Crime | पुण्यात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार ! प्रियकर आणि त्याच्या मित्राकडून ‘डर्टी पिक्चर’ व्हायरल; येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime | पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्यासह दोघांवर FIR, प्रचंड खळबळ; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावरील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी तर ड्रायव्हर फरार

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News