कोल्हापूरताज्या बातम्याराजकीय

Kolhapur North By Election Result 2022 | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा विजय; भाजपच्या सत्यजीत कदम यांचा मोठा पराभव

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur North By Election Result 2022 | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीचा (Kolhapur North By Election Result 2022) निकाल नुकताच हाती आला असून या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayshree Jadhav) विजयी झाल्या आहेत. भाजपकडून (BJP) असलेले सत्यजित कदम (Satyajit Kadam) यांचा मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी बाजी मारली आहे.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि काँग्रेसचे नेते, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यात ही खरी लढत मानली जात होती. या पोटनिवडणुकीचे नेतृत्व या दोन्ही नेत्याकडून करण्यात आले. दरम्यान महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात असली तरी चंद्रकांत पाटील यांना एक मोठा धक्का मानला जात आहे.

 

दरम्यान, आज (शनिवारी) सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली होती.
26 टेबलांवरती 26 फेऱ्यांत 357 केंद्रावरील मतमोजणी करण्यात आली.
यात अगदी पोस्टल मतांच्या फेरीपासूनच घेतलेली मतांची आघाडी जयश्री जाधव यांनी शेपटपर्यंत कायम ठेवत विजयाची कमान रोवली आहे.
जयश्री जाधव या 18, 901 मतांनी विजयी झाल्या आहेत. या विजयाचा उत्साह कोल्हापूरसह राज्यात दिसून येत आहे.

 

Web Title :- Kolhapur North By Election Result 2022 | Congress Jayashree Jadhav wins Kolhapur North Assembly by election Big defeat for BJPs Satyajit Kadam

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button