Kolhapur North By Election Result 2022 | ‘मी हारुनही जिंकणारी बाजीगर’ ! उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये करूणा शर्मांना मिळाली इतकी मते, जाणून घ्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये (Kolhapur North By Election Result 2022) काँग्रेसला अच्छे दिन आल्याचं म्हणता येईल. काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री जाधव (Jayshree jadhav) 18, 901 मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी भाजपचे (BJP) उमेदवार सत्यजीत कदम (Satyajit Kadam) यांचा पराभव केला आहे. त्यासोबतच या पोटनिवडणुकीच्या (Kolhapur North By Election Result 2022) रिंगणात करूणा शर्मासुद्धा (Karuna Sharma) होत्या. त्यामुळे त्यांना किती मते पडतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं.

 

करूणा शर्मा यांचं डिपॉझिट जप्त (Deposit Confiscated) होण्याची वेळ आली. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या होत्या. 26 व्या फेरीनंतर करुणा मुंडेंना एकूण 133 मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे मुंडेंपेंक्षा अधिक मतं नोटाला मिळाली. नोटाचा (NOTA) पर्याय एकूण 1 हजार 788 जणांनी निवडला. करूणा शर्मा यांना जनतेने कौल दिला नाही. मात्र त्यांनी ही निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे कारण आचार संहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ही मतमोजणी (Counting of votes) रद्द करून निवडणुकच (Election) पुन्हा घ्यायला हवी होती मात्र तरीही मतमोजणी सुरू आहे.
याविरोधात आपण सुप्रिम कोर्टात (Supreme Court) धाव घेणार असल्याचं करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
पोटनिवडणुकीच्या 10 तारखेला आचारसंहिता संपली होती मात्र तरीही भाजप (BJP) आणि काँग्रेसने मोठ्या वर्तमानपत्रात (Newspaper) जाहीराती दिल्या.
त्यासोबतच या पक्षांचे लोक इथं पैसे वाटताना पकडले गेले आहेत.
काँग्रेस आणि भाजपकडून 40 लाखांहून अधिक खर्चही झाला आहे.
याबाबत मी निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याचं करूणा शर्मा यांनी सांगितलं.

 

दरम्यान, मी हारुनही जिंकणारी बाजीगर आहे. या निवडणुकीत बरचं काही शिकायला मिळालं असून मी देवाचे आभार मानते,
असं करूणा शर्मा म्हणाल्या आहेत.

 

Web Title :- Kolhapur North By Election Result 2022 | kolhapur byelection karuna sharmas deposit confiscated by elections will be demanded again

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा