कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई ; शिरोली टोलनाक्यावर कारमधून ६२ लाखांची रोकड जप्त

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रोकड जप्त करण्याची कारवाई सुरु आहे. त्यात शिरोली टोलनाक्यावर कोल्हापूर पोलिसांनी एका ओम्नी कारमधून ६२ लाख ६८ हजार ४४ रुपयांची रोकड जप्त केली आहे. मागील काही दिवसांत कोल्हापूर पोलिसांनी ही चौथी मोठी कारवाई केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून रोकड जप्त करण्याची कारवाई सुरु आहे. लोकसभा निवडणूकीत मोठया प्रमाणावर रोकड नेली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यात कोल्हापूर पोलिसांनी शिरोली टोलनाक्यावर एक ओम्नी कार पकडली. या कारमधून पोलिसांनी ६२ लाख ६८ हजार ४४ रुपयांची रोकड जप्त केली आहे. कोल्हापूरमधील पचगावच्या शशिकांत भीमा जिगरी यांच्याकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम जप्त करून पोलिसांनी आयकर विभागाच्या ताब्यात दिली आहे. या रकमेसंदर्भात चौकशी सुरु असून पुढील कारवाई सुरु आहे. मागील १५ दिवसात कोल्हापूर पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.