PM-Kisan सन्मान योजनेवर डल्ला, आणखी धक्कादायक माहिती उघड, जाणून घ्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थ्यांनी घेतल्याचे उघड झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात याप्रकरणी कारवाई करत अशा व्यक्तींचा शोध घेण्याचे काम प्रशासन करत असतानाच आता सांगली जिल्ह्यातही 14 हजार 267 बोगस लाभार्थी आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बोगस लाभार्थ्यांनी घेतलेले 11 कोटी 35 लाख रुपये परत द्यावेत, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. नगर आणि सांगलीत हजारो बोगस लाभार्थी सापडल्याने राज्यभरात मोठ्या संख्येने योजनेचा गैरफायदा घेतल्याची शक्यता आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, संबंधितांकडून तात्काळ रक्कम वसूल करण्यासाठी तालुकास्तरावर सूचना दिल्या आहेत. तालुकास्तरावर अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा पाठवण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सांगली जिल्ह्यात 4 लाख 58 हजार 190 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांपैकी 1 हजार 660 अपात्र लाभार्थी व 22 हजार 607 आयकर भरणार्‍या अपात्र लाभार्थ्यांची यादी सरकारकडून पोर्टलवर जाहीर झाली आहे. या योजनेतून 1 हजार 660 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 89 लाख 54 हजार, तसेच 12 हजार 607 आयकर भरणार्‍या लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 कोटी 46 लाख 6 हजार रूपये रक्कम जमा झाली आहे.

सांगलीतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या आणि कंसात त्यांना मिळालेली रक्कम :

आटपाडी 14 (68 हजार रुपये)
जत 48 (3 लाख 4 हजार रुपये)
कडेगाव 159 (7 लाख 10 हजार रुपये)
कवठेमहांकाळ 122 (5 लाख 50 हजार रुपये)
खानापूर 39 (2 लाख 22 हजार रुपये)
मिरज 763 (45 लाख 24 हजार रुपये)
पलूस 188 (8 लाख 58 हजार रुपये)
शिराळा 22 (1 लाख 12 हजार रुपये)
तासगाव 184 (9 लाख 86 हजार रुपये)
वाळवा 121 (6 लाख 20 हजार रुपये)
* एकूण 1 हजार 660 अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवर 89 लाख 54 हजार रुपये रक्कम जमा.

आयकर भरणार्‍या अपात्र लाभार्थ्यांची संख्या व कंसात खात्यावर जमा रक्कम :

आटपाडी 1548 (1 कोटी 24 लाख 84 हजार रुपये)
जत 1206 (97 लाख 88 हजार रुपये)
कडेगाव 1603 (1 कोटी 44 लाख 66 हजार रुपये)
कवठेमहांकाळ 713 (52 लाख 54 हजार रुपये)
खानापूर 1656 (1 कोटी 33 लाख 62 हजार रुपये)
मिरज 1644 (1 कोटी 28 लाख 10 हजार रुपये)
पलूस 862 (72 लाख 76 हजार रुपये)
शिराळा 751 (69 लाख 40 हजार रुपये)
तासगाव 1133 (87 लाख 50 हजार रुपये)
वाळवा 1491 (1 कोटी 34 लाख 76 हजार रुपये)
* एकूण 12 हजार 607 आयकर भरणार्‍या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 10 कोटी 46 लाख 6 हजार रुपये जमा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like