Kolhapur Protest | ‘पडद्यामागे जे कोणी असतील त्यांची सखोल चौकशी करणार’, शंभूराज देसाईंचा सूचक इशारा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Organizations) आज कोल्हापूर बंदची हाक (Kolhapur Protest) दिली आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील व्यवहार पूर्णतः बंद आहेत. तर संबंधित तरुणांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन (Kolhapur Protest) सुरू केले आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे शिवाजी चौक (Shivaji Maharaj Chowk) परिसराला लागून असलेल्या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना (Kolhapur Police) बळाचा वापर करावा लागला.
कोल्हापूरातील परिस्थितीबाबत (Kolhapur Protest) बोलताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री (State Excise Minister) शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, पडद्यामागे जे कोणी असतील त्यांची सखोल चौकशी केली जाईल, असा सूचक इशारा त्यांनी दिला. तसेच कोल्हापुरात हिंसाचार (Violence) सुरु झाल्यानंतर दोन ते तीन वेळा मी कोल्हापूरच्या जिल्हा प्रमुखांशी बोललो. जमावाला शांततेच्या मार्गाने पांगवण्याचं आमचं पहिलं प्राधान्य आहे. काही प्रमाणात जमावाकडून गाड्यांची तोडफोड झाली. त्यामुळे जमावाला सौम्य पद्धतीने पांगवण्याचं काम पोलिसांकडून झालं, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.
तर जमाव प्रक्षुब्ध होतो
जमाव प्रक्षुब्ध का झाला याचा विचार आधी केला पाहिजे. एकाएकी जमाव प्रक्षुब्ध होत नाही. औरंगजेबाचे (Aurangzeb) फोटो डोक्यावर घेऊन काही लोकांनी संभाजीनगर येथे मिरवणूक काढली. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र आहे. क्रुरकर्मा औरंगजेबाने 40 दिवस अतोनात छळ करत संभाजी महाराजांचा वध केला. अशा औरंगाजेबाचा फोटो डोक्यावर घेऊन कोणी नाचत असेल तर जमाव प्रक्षुब्ध होतो, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
गुप्तचर खात्याकडून चौकशी झाली पाहिजे
याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. हे करणारे कोण आहेत? डोक्यावर फोटो घेऊन नाचवणारे पडद्यामागे कोण आहेत?
याचा शोध घेतला पाहिजे. आज मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन
पोस्ट करणारे, फोटो डोक्यावर घेऊन नाचणारे आणि त्यांच्या मागे जे कोणी आहेत त्यांची सायबर सेलमार्फत
चौकशी (Cyber Cell Inquiry) झाली पाहिजे, अशी मागणी करणार आहे.
वेळप्रसंगी राज्याच्या गुप्तचर खात्याकडून (Intelligence Agency) त्यांची चौकशी झाली पाहिजे, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
विकास कामांना खीळ बसवण्यासाठी…
गेले 11 महिने महाराष्ट्रात शांततेचे वातावरण आहे. विकासाची कामे सुरु आहेत.
याला खिळ बसवण्यासाठी, गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात
कोणी करतंय का याच्या खोलावर जाणं आवश्यक असल्याचे देसाई म्हणाले.
Web Title : Kolhapur Protest | therefore the crowd in kolhapur was agitated shambhuraj desai clearly stated said due to the wreckage of the cars
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा