राजू शेट्टींच्या आईने घरी आलेल्या धैर्यशील मानेंना दिला ‘हा’ आशीर्वाद ; म्हणाल्या…

कोल्हापूर : पोलीसानामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनाही मोठे धक्के मिळाले. त्यानंतर सर्वत्र वेगवेगळी चित्र पहायला मिळाली. सर्वात उलट आणि वेगळ चित्र कोल्हापूरात पहायला मिळालं. कोल्हापूरात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा पराभव केला. विजयानंतर धौर्यशील माने यांनी राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. तसंच राजू शेट्टींशीही संवाद साधला.

धौर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांच्या घरी गेले. तेथे राजू शेट्टींच्या आईने त्यांचे औक्षण केले. त्यानंतर त्यांचा आशिर्वादही घेतला. मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहूदे सर्वकाही चांगलं होईल, असं धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्या आईला म्हणाले. त्यावर राजू शेट्टींच्या आईनेही ‘माझा आशीर्वाद लय मोठा आहे. माझा लेक सर्वांना धरुन आहे, तसं तुम्हीही लोकांना धरुन राहा. माझ्या मुलासारखं चांगलं काम कर’, असा आशीर्वाद दिली.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात लढत होती. या लढतीत धैर्यशील माने राजू शेट्टींवर भारी पडले आणि शेट्टींचा पराभव झाला. राजू शेट्टी हे सर्वात प्रसिद्ध नेते आहेत. ते त्यांच्या कामामुळे ओळखले जातात. मात्र ९० हजार मतांच्या फरकाने धैर्यशील माने यांनी बाजी मारली. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. राजकारणाच्या पलिकडे जात थेट राजू शेट्टी यांचं घर गाठून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि राजकारणातील खेळाडू वृत्ती दाखवली आहे.