प्रेग्नंन्ट महिलेला विमानात त्रास, कोल्हापूरचा तरुण ठरला ‘देवदूत’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे जगभरात भीती निर्माण झाली आहे. चीनमधून जगातील अनेक देशांत पसरलेल्या या व्हायरसने संकट ओढावले आहे. या संकटाच्या काळात माणुसकीचे दर्शन घडवणार्‍या घटना घडत आहेत. आताही असाच एक प्रकर घडला आहे. कोल्हापूरच्या एका तरुणाने विमान प्रवासावेळी कॅनडातून भारतात येत असताना प्रसंगावधान राखत गरोदर महिलेवर प्रथमोपचार केले. रमाकांत रावसाहेब पाटील असे या तरुणाचे नाव असून त्याने केलेल्या या सेवेसाठी विमान कंपनीने त्याला बक्षीसही दिले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अनेकांनी आपआपल्या देशात परतण्यास सुरुवात केली. कॅनडातून विमानाने येत असताना एका गरोदर महिलेच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. त्यावेळी विमानात अनाउन्समेंट झाली की, वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित कोणी प्रवास करत आहे का ? तेव्हा विमानात असलेला कोल्हापूरचा रमाकांत पाटली तरुण पुढे झाला. त्याने विमानातील क्रू मेंबर्ससह संबंधित महिलेवर प्रथमोपचार केले कॅनडातील हॉस्पिटलमध्ये हेल्थकेअर असिस्टंट म्हणून रमाकांत काम करतो.

भारतात येत असताना कॅनडा ते नेदरलँड आणि नेदरलँड ते भार असा प्रवास केला. त्यावेळी कॅनडा ते नेदरलँड प्रवासावेळी लोकांची तारांबळ उडाली होती. तेव्हा त्याच विमानातून एक भारतीय गरोदर महिलाही प्रवास करत होती. विमानाचे उड्डाण होताच महिलेच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. विमानातील क्रू मेंबर्सनी तिच्यावर प्रथमोपचाराचे प्रयत्न केले. महिलेवर उपचारासाठी विमानात कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आहे का अशी विचारणाही करण्यात आली.

तेव्हा रमाकांत तरुण पुढे आला. त्यानं नर्सिंग क्षेत्रातील त्याच्या अनुभवाच्या जोरावर महिलेवर उपचार केले. विमानाच्या दोन तासांच्या प्रवासात महिलेची प्रकृती स्थिर ठेवण्याचे काम केले. नेदरलँडमध्ये विमान उतरल्यानंतर महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.