विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून ‘विजयस्तंभ’ परिसराची पाहणी

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (सुरेश वांढेकर) – कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डाॅ. सुहास वारके यांनी 1 जानेवारी 2020 रोजी पेरणे फाटा, कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पुर्व तयारीची पाहणी केली.

1 जानेवारी 2020 रोजी पेरणे फाटा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पुर्व तयारीला प्रशासनाकडून वेग येताना दिसत आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डाॅ. सुहास वारके यांनी आज पेरणे फाटा, कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पुर्व तयारीची केली पाहणी केली. यामध्ये वाहतूक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इतर नियोजनासह सर्व व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी डाॅ. सुहास वारके, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिप पाटील, बारामती विभागाचे पोलीस उप अधीक्षक जयंत मीना यांच्या सह हवेलीच्या डिवायएसपी सई भोरे पाटील, दौंडचे उपविभागीय अधिकारी सचिन बारी, डीवायएसपी ऐश्वर्या शर्मा, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/