कौतुकास्पद ! पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नायब तहसीलदारांनी स्वतः वाहून नेली अन्नधान्याची पोती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच स्तरांमधून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. निगडी येथील अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्नधान्याची पोती रवाना करण्यात आली आहे. ही अन्नधान्याची पोती स्वतःच्या खांद्यावर वाहून नायब तहसीलदार तथा परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे. परिस्थितीचे भान समजून पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या धान्याची पोती स्वत: खांद्यावरून वाहून नेली.

एकीकडे मोठे अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व कामे करून घेताना पहायला मिळतात अशात दिनेश तावरे यांनी केलेले हे काम खरंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. पूरग्रस्तांसाठी सर्वच स्तरांमधून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत मराठी चित्रपट सृष्टीतून पुणे, मुंबई भागातून मोठ्या प्रमाणावर मदत कार्यासाठी अनेक कलाकारांनी एकत्र येऊन वस्तू, अन्यधान्यांची मोठ्या प्रमाणावर मदत कोल्हापूर, सांगलीच्या दिशेने पाठवून दिली आहे.

दौंडमध्ये ईदच्या निमित्ताने ईदगा मैदानावर नमाज पठणाच्या वेळी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत गोळा करण्यात आली. मदतीला कोणताच धर्म नसतो, हे यावेळी दिसून आले. पंढरपूर येथील संतपेठ सात नंबर शाळा, अवतारी गल्‍ली येथील रहिवाशांनी कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांना प्रत्येक घरातून वर्गणी गोळा करण्यात आली. साड्या- कपडे लहान मुलांचे कपडे, पाण्याच्या बाटल्या, चिवडा या वस्तू देण्यात आल्या.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like