Coronavirus | …म्हणून कोल्हापूर, सांगली, साताऱ्याची चिंता कायम

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) कोल्हापूर (Kolhapur), सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. असं असलं तरी आता राज्यातील २१ जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) दर हा पाच टक्क्यांहून कमी आहे. कोल्हापुरचा गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना रुग्णांची रोजची आकडेवारी ही १५००० ते २२०० पर्यंत वाढत आहे. कोल्हापुरचा कोरोना (Coronavirus) पॉझिटिव्ह दर हा ११ टक्के, सांगलीचा १० टक्के तर साताऱ्याचा ९.७५ टक्के इतका आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आता ग्रामीण भागातील कोरोना (Coronavirus) संसर्ग रोखण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यासाठी निर्बंधांचे पालन करण्याऐवजी नागरिकांकडून करण्यात येणारा हलगर्जीपणा हा अधिक जबाबदार असल्याचं दिसून येतंय. शनिवारी आणि रविवारी कोल्हापुरात कडक लॉकडाऊन लावण्यात आला असून नागरिकांना बाहेर पडू नयेत अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या कोल्हापूर जिल्हा हा चौथ्या स्तरामध्ये असला तरी निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे हा दर पुन्हा वाढतो की काय अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊनच्या निर्बंधाचे कडक पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर पोलिसांची नियुक्ती केली आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील प्रसार आता चिंताजनक असून काही ठिकाणी गावंच्या-गावं कोरोनाबाधित (Coronavirus) झाल्याचं दिसून आलं आहे. या ठिकाणची परिस्थिती पाहून राज्याच्या टास्क फोर्सनेही या ठिकाणी भेट दिली असून काही आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत. कोल्हापुरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना स्वत:हून काही निर्बंध पाळावेत अशा प्रकारचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

Wab Title :-kolhapur sangli satara coronavirus infection more in rural areas than urban areas

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा