कोल्हापुरात राष्ट्रवादीला काँग्रेसकडून उघड-उघड विरोध

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख आहे. देशभरात काँग्रेस राष्ट्रवादी यांची महाआघाडी भाजपशी दोन हात करण्यासाठी तयार आहेत. पण कोल्हापूर मतदार संघात मात्र चित्र निराळेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. पण, त्यांना आता काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अडचणीत आणले आहे . ‘ज्यांनी आपला विश्वासघात केला… त्यांना आपण मदत करायची का? आमचं ठरलंय आता ज्यांनी विश्वास घात केला, त्यांना मदत करायची नाही…’ असं म्हणत सतेज पाटलांनी महाडिक यांना दणका दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातले काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडीक यांच्या विरोधात उघड भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हातात हात घालून निवडणुकीला सामोरं जाणार असले तरी ते चित्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दिसेल का? याबद्दल शंका आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात वरवरची लढाई ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना दिसत असली तरी काही भागात धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी होईल, असं दिसते आहे. त्याचा फायदा काही प्रमाणात शिवसेनेलाच होण्याची शक्यता जास्त आहे.

ह्याहि बातम्या वाचा

नरेंद्र मोदी म्हणतात ‘कदाचित भगवान शंकर मला बोलले, की बोलतोस खूप जरा काम पण करुन दाखव’

फक्त महिलांसाठी कोंढवा येथून बससेवा सुरू            

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळले

दैवी शक्ती असल्याचे सांगून बलात्कार केल्या प्रकरणी ७५ वर्षीय नागरिकाची निर्दोष मुक्तता