कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, पत्नी व मुलाला देखील लागण

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक व जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ खासदारही बाधित झाल्यामुळे चिंता वाढली आहे. यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे कोरोना उपचार घेत आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे.