Kolhapur : अरे बापरे! शिक्षकाने विद्यार्थ्याच्या डोक्यात वीट फेकून मारली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

कोल्हापुरात गाणी ऐकत असल्याच्या कारणावरून वाद झाल्याने शिक्षकाने चक्क डोक्यात वीट फेकून मारल्याचे वृत्त आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) वर्गात विद्यार्थी अथर्व विजय गायकवाड (वय 18, रा. सानेगुरुजी वसाहत) गाणी ऐकत बसला होता. आयटीआय आवारातील प्लम्बिंग वर्कशॉपजवळ बुधवारी दुपारी हा प्रकार घडला. शिक्षक राज घोडके यांनी अथर्वला गाणी बंद करायला सांगितली पण अथर्वने नकार दिला या कारणावरून दोघांच्या वाद झाला. दोघेही वर्गाच्या बाहेर आले आणि भांडणात शिक्षक राज घोडके यांनी अथर्वच्या डोक्यात वीट फेकून मारली. यात अथर्वला जखम झाल्यामुळे त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान ही घटना पाहणाऱ्या विद्यार्थ्यानी या सर्व प्रकाराची माहिती व्यवस्थापनाला दिली. घटनेची माहिती मिळताच अथर्वचे आई-वडील देखील रुग्नालयात आले.

याबाबत शिक्षक राज गोदके यांनी सांगितलेली माहिती अशी की, आयटीआयमध्ये प्लम्बर ट्रेंडसाठी थेअरीचे विषय मी शिकवतो. मी सकाळच्या पहिल्या सत्राचे तास घेत असताना, अथर्व तेथे आला. तो मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकत होता. ती बंद करण्यास सांगितले. यावर ‘तुझा काही संबंध नाही, तू आमच्या बॅचला शिकवत नाही,’ असे तो उर्मट बोलला. तसेच मोबाईल काढून घेऊन त्यांच्या शिक्षकांकडे दिल्याच्या रागातून तो अंगावर धावून आला. त्यावेळी प्रतिकार केला असता तो खाली पडल्याने डोक्याला दुखापत झाली. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यानमध्ये नाराजी आहे.