home page top 1

पक्ष चिन्हांच्या जाहीरातींवर येणार टाच

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहितेची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेक राजकीय पक्षांच्या जाहिराती शहरात लावण्यात आल्या आहेत. या राजकीय जाहिरातींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात जागोजागी भाजपाकडून कमळ चिन्ह रंगवण्यात आले आहे. या भाजपाच्या कमळ चिन्हाच्या प्रतिकृतीवर टाच येणार आहे.

जिल्हा प्रशासनाने राजकीय नेत्यांचे आणि पक्षांचे फ्लेक्स 48 तासांत काढू घेण्याचे आदेश दिले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासनाने नऊ हजार फलकांवर कारवाई केली आहे. यामध्ये स्वागत कमानी, फलक, झेंडे यांचा समावेश आहे. शहरात फुटबाॅल स्पर्धा, महिला मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी मोठी जाहिरातबाजी केली होती. यात स्वागत कमानी आणि जाहिरातीही लावण्यात आल्या होत्या.

गेल्यावर्षी भाजपाने अनेक सार्वजनिक ठिकाणी व सहकारी कार्यालयांवर पक्षांचे कमळ चिन्ह रेखाटलेले आहे. पक्षाने केलेल्या या प्रचाराविरोधात महानगरपालिकेच्या सभागृहात पडसाद उमटल्याचे दिसून आले. यानंतर काँग्रेस पक्षाने या चिन्हाचा निषेध केला होता. याच चिन्हाच्या ठिकाणी विरोधातील टीका करणारा मजकूर लिहत याचा निषेध नोंदवला होता. मतदान केंद्राजवळही काही ठिकाणी कमळ चिन्ह रेखाटलेले आहे. आता जागोजागी रेखाटलेल्या चिन्हांवर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे. ज्या ठिकाणी चिन्हे रेखाटली आहेत ती पांढऱ्या अथवा काळ्या रंगाने खोडून काढली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली.

ह्याहि बातम्या वाचा-

मृत्यूनंतरही फेसबुकवर राहा जिवंत

माढ्याचा तिढा : स्वाभिमानीने आघाडीकडे केली माढ्याची मागणी

आदित्य ठाकरे आणि दिशा पठानी एकत्र ; नेमक काय चाललय ?

महाराष्ट्रात राजकीय मुले पळवणारी टोळी सक्रिय : जितेंद्र आव्हाड

पक्षाने स्वागत केले मीही करणे क्रमप्राप्त : खा. दिलीप गांधी

Loading...
You might also like