पोलिसांनी पकडली ४३ ‘गाढवं’, गाढवांमुळे पोलिस ‘हैराण-परेशान’ ! (व्हिडीओ)

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना काय काय करावे लागू शकते काही सांगता येत नाही. चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. वाळू चोरी करत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चक्क ४३ गाढवांना ताब्यात घेतले आहे. सोबत चार-दुचाकी देखील जप्त केल्या आहेत.

चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू गाढवाच्या मदतीने वाळू-माफिया चोरी करतात. याबाबत पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करण्याचे प्रयत्न केले परंतु चोरटे गाढवे सोडून पाण्यातून पळून जात असल्याने पोलिसांना चोर सापडायचे नाहीत. मात्र पोलिसांनी आता या चोरांचे मुख्य साधन असलेली गाढवेच जप्त केली आहेत. आज नगरपालिका पाणीपुरवठा केंद्राजवळ टाकलेल्या छाप्यात पोलीसांनी तब्बल ४३ गाढवे आणि चार दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलीस येत असल्याची चाहूल लागताच चोरांनी नेहमीप्रमाणे पाण्यात उड्या टाकून धूम ठोकली. यानंतर पोलिसांनी चोरांची गाढवेच जप्त करण्याचा निर्णय घेतला. जप्त केलेल्या दुचाकीसुद्धा चोरीच्या असल्याची माहिती पोलिसांनी समजली.

पोलसांनी वाळू माफियांना धडा शिकवण्यासाठी ४३ गाढवं जप्त केली खरी परंतु यामुळे आता पोलिसांना नवीन काम लागले आहे. गाढवांना चारापाणी पुरविण्याचे काम पोलिसांनी करावे लागले. गाढवांमुळे पोलीस स्टेशनला कोंडवाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार गाढवांना प्राणीमित्र संघटनेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला. या गाढवांच्या अज्ञात मालकांवर आता बेकायदा वाळू चोरीसोबत मुक्या प्राण्यांवरील अत्याचाराची कलमे लावल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य वाढले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय