अरे देवा ! 90 वर्षीय पतीला रॉकेल ओतून पेटवलं, महिलेनं नंतर स्वतःला देखील संपवलं

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  चंदगड तालुक्यातील कडलगे गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वृद्ध पतीला पेटवून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील असं या वयोवृद्ध दाम्पत्याचं नाव असून, आजाराला कंटाळून वृद्ध महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील हे वृद्ध दाम्पत्य एका जुन्या घरात राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष्मण पाटील हे आजारी होते. त्यांची पत्नी पार्वती ह्या त्यांची काळजी घेत असत. पण आता लक्ष्मण पाटील यांच्या आजाराला कंटाळून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवले आणि त्यानंतर स्वतः पटवून घेऊन पत्नी पार्वती यांनी आपली जीवन यात्रा संपवली.

दरम्यान, लक्ष्मण पाटील यांना पहिल्या पत्नीपासून एक आणि दुसरी पत्नी पार्वती यांच्यापासून एक अशी दोन मुले आहेत. परंतु, ही दोन्ही मुले वेगवेगळ्या घरात राहत होते, तर हे वृद्ध दाम्पत्य जुन्या घरात राहत होते. सकाळी सहाच्या सुमारास मुलगा पुंडलिक आई-वडिलांकडे आल्यानंतर त्याच्या ही गोष्ट लक्षात आली. मुलाने सांगितलेल्या माहितीनंतर, मृत पार्वती पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.