Kolhapur Youth Suicide | धक्कादायक ! ग्राईंडर कटरने स्वत:चा गळा कापून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

आयुष्याची चिंता सतावणार्‍याने संपविले आपले जीवन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kolhapur Youth Suicide | एका फ्लॅटमधून सातत्याने फरशी कापण्याच्या ग्राईंडरचा आवाज येत होता. ग्राईंडरचे काम कोणी करत असेल तर तो थोड्या थोड्या वेळाने थांबतो. पण ग्राईंडर मशीनचा न थांबता आवाज येत होता. शंका आल्याने शेजारच्यांनी दरवाजा वाजविल. तर तो आतून बंद होता. कोणी दरवाजा उघडत नव्हते. ग्राईंडरचा आवाज थांबत नव्हता. शेवटी त्यांनी सायंकाळ झाली असतानाही इमारतीचा विद्युत पुरवठा खंडीत केला. पोलिस अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यांनी इमारतीच्या पाठीमागील बाजूने फ्लॅटमध्ये प्रवेश केला. तेव्हा ते आतील दृश्य पाहून अवाक झाले. तरुणाने ग्राईंडरने स्वत:चा गळा कापून घेतला होता. त्यानंतर त्याच्या हातातील ग्राईंडर तसाच बाजूला कलंडून चालू राहिला होता.

नीरज विकास सरगडे (वय २३, रा. बागेश्री अपार्टमेंट, सुधाकरनगर,कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. भविष्यातील आर्थिक अडचणीच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले होते.

नीरज हा आई आणि आजोबांसोबत आईच्या माहेरी बागेश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता.
तो अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. त्याची आई परगावी केली होती.
त्यांच्या घरातून सायंकाळी ७ वाजल्यापासून ग्राईंडरचा आवाज येत होता.
शेजारच्यांना शंका आल्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावला. परंतु, कोणी उघडला नाही. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

नीरजच्या मृतदेहाजवळ त्याने इंग्रजीमध्ये लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. भविष्याबद्दल तो सातत्याने चिंता करत होता. शिक्षण पूर्ण होण्यासाठी लागणारी रक्कम, लग्नासाठी लागणारी रक्कम, मुलाबाळांचा खर्च अशा भविष्यातील खर्चाची तरतूद आपण करु शकणार नाही, या चिंतेने तो ग्रासला होता, असे चिठ्ठीत लिहिले आहे.

आत्महत्या करण्याचा निर्णय त्याने पूर्वीच घेतल्याचे दिसून येते. तयाने नवीन ग्राईंडर कटर आणल्याचे दिसून आले.
रक्त इतरत्र जाऊ नये, यासाठी त्याने आपला चेहरा फडक्याने घट्ट बांधला होता.
गळा कापल्यानंतर त्याच्या हातातील ग्राईंडर मशीन तसेच सुरु राहिल्याने शेजारच्यांना शंका आली व हा प्रकार उघड झाला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | शेतीचा वीजपुरवठा सुरु होण्यासाठी त्यांनी वर्गणी काढून दिली लाच; त्रास देणार्‍या लाईनमनला लाच घेताना पकडले

Pune Lonikand Crime | अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन बलात्कार, आरोपी पतीला अटक

Sena Kesari 2024 In Pune | महेंद्र गायकवाड ठरला सेनाकेसरी 2024, पृथ्वीराज मोहोळवर मात करीत कोरले चांदीच्या गदेवर नाव

Pune Wagholi Crime | वाघोली पोलीस चौकीसमोर पटवून घेतलेल्या रोहिदास जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यु

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti | किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, घोषणांनी दुमदुमला परिसर!

Sharad Pawar-Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी