LIVE : कोल्हापुरात विजयोत्सवाला सुरुवात शिवसेनेचे संजय मंडलिक ७६ हजार मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होती. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक तर भाजप -शिवसेना महायुतीकडून प्रा. संजय मंडलिक हे सध्या ७६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघांतील मतमोजणीला सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ७४ हजार ३४५ हजार मतदार आहेत. त्यापैकी १३,२५,२३१ मतदारांनी मतदान केले होते.

कोल्हापुरातून १३ जण रिंगणात आहेत. कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदाम येथे सुरु आहे. पाचव्या फेरिअखेर मंडलिक ६०३९९ हजार मतांनी आघाडीवर होते. तर ८व्या फेरीत ७६ हजार मतांनी मंडलिक आघाडीवर आहेत. कोल्हापुरात विजयोत्सवाला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात चांगलीच राजकीय खडाजंगी रंगली. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. जनतेचा कौल सध्यातरी मंडलिक यांच्याकडेच आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर उपस्थित आहेत .

खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील हे वैर डोके वर काढत असल्याचे बोलले जात होते . सतेज पाटील यांचा कोल्हापुरात चांगलाच दबदबा आहे. सतेज पाटील स्वतः जरी लोकसभेच्या रिंगणात नसले तरी मात्र आघाडीत असून देखील शिवसेनेला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. या गटबाजीचा फटका महाडिकांना बसला असे सांगण्यात येत आहे . त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत याचा फटका महाडिकांना आणि राष्ट्रवादीला बसणार असल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात होती. पण सध्या हातात आलेल्या नि कालानुसार मंडलिक यांची आघाडी आहे.