अबब ! अचानक पडू लागला नोटांचा ‘पाऊस’ अन् पैसे ‘जमा’ करण्यासाठी लोकांची ‘रेलचेल’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलकत्त्याच्या रस्त्यांवर अचानक एका इमारतीतून पैशांचा पाऊस पडल्याचे चित्र पहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीमध्ये आयकर विभागाने छापा टाकल्याने खिडकीतून हा पैसा खाली टाकण्यात आल्याचे समजते.

नोटा नंतर बंडलांचा पाऊस
नोटांचा पडलेला पाऊस तुम्ही केवळ सिनेमामध्ये पाहिला असेल परंतु कलकत्त्यातील लोकांना याचा प्रत्येय स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आला आहे. यावेळी 2000, 500 आणि 100 च्या नोटा हवेत मोठ्या प्रमाणावर उडत होत्या. पाहणाऱ्याला मात्र एवढा सारा पैसा कसा उडत आहे हे समजत नव्हते. त्यातच नोटांच्या पावसानंतर थेट बंडलच खाली पडू लागले. खिडकीमध्ये काही नोटांचे बंडल अडकले असता काठीच्या सहाय्याने त्यांना खाली पाडण्यात आले.

वरून नोटांचे बंडल पडत होते आणि लोक त्यांना उचलण्याचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी आयात निर्यात व्यवसायाशी संबंधित असलेल्या एका खाजगी कंपनीवर आयकर विभागाने छापा टाकला होता.

ज्यावेळी येथील कर्मचाऱ्यांना समजले की आयकर विभागाकडून छापा पडणार आहे त्यावेळी या कार्यालयातून आठ ते दहा लाख रुपयांचे बंडल खाली टाकण्यात आले. मात्र अधिकृतपद्दतिने अद्याप या कंपनी संधर्भात तसेच या छाप्यात किती रक्कम जमा करण्यात आली अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

Visit : Policenama.com