ICC World Cup 2019 : भारताच्या पराभवाच्या धक्क्याने दुकानदाराचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात काल न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी विजय मिळवत धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अनेक भारतीयांचे श्वास रोखून धरले होते. त्याचबरोबर काही क्रीडा रसिकांच्या जीवाला हा पराभव लागला. धोनी आणि जडेजा यांनी विजयासाठी प्रयत्न केले मात्र त्या दोघांना विजय मिळवून देण्यात अपयश आले. या पराभवानंतर कोलकात्यात एका क्रीडा रसिकाचा हा पराभव सहन न झाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

पश्चिम बंगालच्या कोलकात्यामधील श्रीकांत मैती हा ३३ वर्षीय सायकल दुकानदार कालचा सेमीफायनल सामना आपल्या दुकानात बसून पाहत होता. अखेरच्या ११ चेंडूवर भारताला विजयासाठी २५ धावांची गरज  होती. मात्र ४९ व्या षटकात धोनी धावबाद झाला. हा झटका सहन न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर शेजारच्या दुकानदारांनी त्याला जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, कालच्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाने फायनलमध्ये खेळण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

Loading...
You might also like