Republic Day प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसू शकतो ‘कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट’चा ‘चित्ररथ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनी आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट (केओपीटी) आपला चित्ररथ सादर करु शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय शिपिंग मंत्रालयद्वारे केपीटी या चित्ररथात त्यांचा समृद्ध इतिहास, बंदरावरील अत्याधुनिक यंत्रणासारखा विशेष प्रकार चित्ररथात प्रदर्शित करेल.

तसेच जेव्हा चित्ररथ राजपथवरुन जाईल तेव्हा कोलकत्ता पोर्ट ट्रस्टचे ते गाणे देखील वाजवले जाईल जे पंतप्रधान मोदींनी मागील आठवड्यात केपीडीच्या 150 व्या वर्धापनदिनी लॉन्च केले होते. यावर अजून चाचणी सुरु आहे. विषय ‘ग्लोरियस पास्ट वायब्रेंट फ्यूचर’ला मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे, ज्यावर 23 जानेवारीपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींनी केपीटीच्या दौऱ्यावर असताना केपीटीचे नाव बदलून ते जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नावे ठेवण्यात आले होते. केपीटीच्या समृद्ध इतिहासावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट फक्त जहाजांच्या येण्या-जाण्याचे ठिकाण नाही तर त्यांचा स्वत:चा इतिहास आहे. या पोर्टने देशाला स्वराज्य मिळताना, सत्याग्रह आणि देश बदलताना पहिले आहे.

उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पश्चिम बंगालच्या चित्ररथाला सहभागी न करुन घेण्याचे सांगितले होते. संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले की बंगाल सरकारच्या चित्ररथाचा प्रस्ताव विशेषज्ञ समितीकडे दोनदा पाठवण्यात आला होता. दुसऱ्या बैठकीत विस्तृत चर्चेनंतर हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. यावर तृणमूल काँग्रेसने संतापजनक प्रतिक्रिया देत याला बंगालचा अपमान सांगितले. आता केपीटीच्या चित्ररथाला जागा मिळेल असे वृत्त असल्याने पश्चिम बंगालच्या रहिवाशांमध्ये समाधान असेल.

फेसबुक पेज लाईक करा –