धक्कादायक ! हातात सिगारेट धरून झोपणं पडलं महागात, होरपळून मृत्यू

कोलकाता : वृत्तसंस्था – जे कोणी सिगारेट पित असतील त्यांच्यासाठी ही खूपच महत्त्वाची बातमी आहे. कारण असं तुमच्यासोबतही घडू शकतं. एखादी लहान चूकही तुम्हाला महागात पडू शकते ज्यामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. जळती सिगारेट हातात घेऊन झोपणं एकाला चांगलंच महागात पडलं आहे. एकाने जळती सिगारेट हातात ठेवली आणि तो तसाच झोपी गेला. यानंतर त्याच्या सिगारेटमुळे त्याच्या बिछान्यानं पेट घेतला. या आगीत जळाल्यानं त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. कोलकात्यामधील ही घटना आहे. इलियास असं या 74 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

74 वर्षी इलियास सिगारेटचे झुरके मारत मारतच झोपी गेले होते. हातातली सिगारेट जळती असल्याने त्या सिगारेटमुळे त्यांच्या बेडनं पेट घेतला. या आगीत इलियास होरपळून निघाले. या घटनेनंतर त्यांना एसएसकेएम रुग्णलायत दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी एमआर बंगूर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. शनिवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

इलियास यांच्याबद्दल बोलताना इलियास चेन स्मोकर असावे असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला. सिगारेटनं बेड जळून इलियास यांचा मृत्यू झाला की याचे आणखी काही कारण आहे या दिशेनंही पोलीस विचार करत आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. लवकरच इलियास यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येतान दिसेल असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like