‘या’ कारणामुळं नर्सनं नवजात बाळाला पाजलं दूध

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असून बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात नवजात बालकांचा जन्म होत आहे. कोलकातामधील एका रुग्णालयात असाच प्रकार घडला आहे. रुग्णालयात एक महिलेने बाळाला जन्म दिला होता. मात्र कोरोनाच्या भीतीने आईने बाळाला हात लावण्यास नकार दिला. एवढेच नाही तर बाळाता दूधही पाजले नाही. अखेर रुग्णालयात काम करणार्‍या एका परिचारिकेने बाळाला दूध पाजले. कोरोनाच्या संकट काळात पुढचा मागचा विचार न करता या परिचारिकेने केलेल्या या कामाचे सर्वत्रा कौतुक होत आहे.

रूग्णालयात महिलेची सिजेरिअन डिलिव्हरी झाल्यामुळे ती बाळाला दूध पाजू शकत नव्हती. तर, या परिचारिकेनेही काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे नवजात बालक भुकेने व्याकुळ झालेले नर्सला पाहवले नाही, अखेर तिनेच त्या बाळाला दूध पाजले आहे. कोरोनाचा प्रसार होण्याची भीती लहान बालकांमध्ये जास्त असल्यामुळे नवजात बाळाच्या घरच्यांनी त्याला हात लावला नाही. त्यामुळे भीतीपोटी या बाळाला दूधही पाजले नाही. या वॉर्डमध्ये अशा अनेक महिला होत्या, ज्यांची डिलिव्हरी झाली होती. मात्र सगळ्यांच्या मनात एकच भीती होती. दुसरीकडे या नर्स सर्व लहान मुलांची आई झाल्या आहे. कोरोना योद्धा असलेल्या नर्सला 8 महिन्यांचा मुलगा आहे. अशा परिस्थितीतही त्या बाळाला एकटे सोडून कर्तव्य बजावत आहेत. यापरिचारिके ने हायजीन प्रोटोकॉल पाळत या बाळाला दूध पाजले आहे. या घटनेनंतर सर्वत्र या परिचारिकेच्या कामाचे कौतुक केले जात आहे.