अनेक महिन्यांपासून विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोलकात्यातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि रंगभूमीवरील कलाकार सुदीप्तो चटर्जीवर त्याच्या नाटकाच्या ग्रुपमधील एका विद्यार्थिनीने अनेक दिवसांपासून तिच्यावर बलात्कार करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अनेक महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार होत असल्याचं तिने सांगितले आहे. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे सुदीप्तोने त्याच्यावरील सर्व आरोप मान्य केले आहेत. या प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याचे समजत आहे.

पीडितेने याबाबत सोशल मीडियावर माहिती दिल्याने हे प्रकरण समोर आले. पीडितेने म्हटले की, “सुदीप्तोने अभिनय शिकवण्याच्या कारणाने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला. मी अनेकदा तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने मात्र मला माझे करिअर संपवण्याची धमकी दिली होती. म्हणून मी शांत होते.”

धक्कादायक बाब अशी की, आणखी दोन विद्यार्थिनींनी देखील त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

चौकशी दरम्यान सुदीप्तोने बलात्काराचे आरोप फेटाळले. तरुणी सोबत त्याने शारीरिक संबंध ठेवल्याचे मान्य केले. त्याचे म्हणणे आहे की, दोघांच्या संमतीने हे संबंध ठेवण्यात आले होते. सुदीप्तोने पीडितेला केलेल्या मोबाईलवरील मेसेजच्या आधारावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

You might also like