सीबीआयच्या माजी अधिकाऱ्यांच्या घरावर छापे

कोलकाता : पश्चिम बंगाल वृत्तसंस्था – ममता बॅनर्जी यांनी रविवारी सीबीआयच्या अधिकाऱ्याना अटक करायला पोलीसांना पाठवल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले होते. यावरच आज पुन्हा कढी करणारा प्रकार पश्चिम बंगाल मध्ये घडला आहे. कोलकाता पोलिसांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या दोन माजी अधिकाऱ्यांच्या घरावर धाडी टाकण्याचा प्रकार केल्याने केंद्र आणि राज्य वादाला नव्याने तोंड फुटले आहे. त्याच प्रमाणे कोलकाता पोलिसांनी माजी अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांच्या पत्नीच्या कंपनीवर हि धाड टाकण्यात आली आहे.

अँजेलिना मर्केनटाईल प्रा. लि. असे नागेश्वर राव यांच्या पत्नीच्या कंपनीचे नाव आहे. साल्ट लेकमध्ये ही कंपनी काम करत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे सीबीआयचे माजी संचालक नागेश्वर राव कायदेशीर पेचात सापडले आहेत.

मागच्या काही दिवसात ममता सरकारने प. बंगालमध्ये परवानगीशिवाय सीबीआय अधिकाऱ्यांना छापेमारी करण्यास बंदी घातली होती. कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थळी चिटफंड प्रकरणाच्या संदर्भात छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सर्व हाय होल्टेज ड्राम्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद नव्याने सर्वांच्या समोर आला होता.