चक्क अंडरविअरमध्ये 2 किलो सोनं लपवून तस्करी; 22 वर्षीय विद्यार्थीनीला विमानतळावर अटक

पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल1 कोटी किंमतीचे 2 किलो सोने चक्क अंडरविअरमध्ये लपवून तस्करीचा प्रयत्न करणा-या कोलकात्याच्या एका 22 वर्षीय विद्यार्थीनीला लखनौ विमानतळावर अटक करण्यात आली आहे. अटक केलेली विद्यार्थीनी मंगळवारी (दि. 13) इंडिगोच्या विमानाने दुबईहून लखनौला आली होती.

कस्टम विभागाच्या उपायुक्त निहारिका लाखा यांनी सांगितले की, कोलकात्यात राहणारी 22 वर्षीय विद्यार्थीनी 13 एप्रिल रोजी इंडिगो विमानाने दुबईहून लखनौला आली होती. जवळसपास 2.3 किलोग्रॅम सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात ती होती. विमानतळाबाहेर वाट पाहत असलेल्या एका व्यक्तीला ती सोने सोपवणार होती. तिने सोन्याचे बिस्किट्स पांढऱ्या पॉलिथीनमध्ये ठेऊन आपल्या अंडरविअरमध्ये लपवले होते. या सोन्याची किंमत 1.13 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या विद्यार्थिनीचे वडील तांदळाचे ठोक व्यापारी आहेत. अटक केलेल्या विद्यार्थीनीला न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी कारागृहात केल्याचे लाखा यांनी सांगितले.