काय सांगता ! होय, पत्नीचे होते 14 प्रियकर, पतीनं सर्वांना नोटीस पाठवून मागितले 100 कोटी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोलकात्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, जी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. जेथे पतीने आपल्या पत्नीचे अवैध संबंधाचा तपास करण्यासाठी सतत हेरगिरी केली. यानंतर उघडकीस आलेलं सत्य खूप धक्कादायक होतं. त्याच्या पत्नीला एक नसून 14 प्रियकर आहेत. यानंतर, त्याने जे केले त्यामुळे प्रत्येकजण हैराण आहे. माहितीनुसार पत्नीचे 14 पुरुषांशी अवैध संबंध उघडकीस आणल्यानंतर नवऱ्याने सर्वांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. पतीने 14 पुरुषांकडून नुकसानभरपाई म्हणून 100 कोटींची मागणी केली आहे. त्याचे म्हणणे आहे की, 14 लोकांसोबतच्या अवैध संबंधांमुळे त्यांचे वैवाहिक जीवन बिघडले आहे.

या महिलेचा नवरा कोलकाता येथील बिझनेसमॅन आहे. या पुरुषांमुळे त्याचे वैवाहिक जीवन उध्वस्त झाले आहे असा त्याचा आरोप आहे. त्याची समाजातील प्रतिष्ठाही कलंकित झाली आहे. म्हणून त्याने आपल्या कार चालकाला हेर बनवून प्रत्येकाविरूद्ध पुरावे गोळा केले आहेत. पतीने 14 लोकांना स्वतंत्र नोटिसा पाठविल्या आहेत. त्या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की नोटीस मिळाल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत मानहानीची भरपाई न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नोटीसमध्ये पतीने असे लिहिले आहे की, “मला कळले की आपण लोक माझ्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवता आणि गोपनीय पद्धतीने माझ्या पत्नीशी संपर्क साधता”.

पुढे त्याने लिहिले की, ‘तो विवाहित आहे हे आपणा सर्वांनाच माहित आहे. तसेच, तुम्हाला हे देखील माहित आहे की मी तिचा नवरा आहे. माझं वैवाहिक आयुष्य तुमच्या अवैध संबंधांमुळे बिघडलं आहे. मी संकटात जगत आहे माझी सामाजिक प्रतिमा कलंकित झाली आहे. तुम्ही सर्वांना 2 आठवड्यांच्या आत मानहानीसाठी 100 कोटी रुपये द्यावे लागतील. आपण हे न केल्यास आपल्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.