कोलकात्यात पार पडला पहिला ‘ट्रान्सजेंडर’ विवाह, जोडपं म्हणालं – ‘आता तरी लोकांचा दृष्टीकोन बदलेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकात्यामध्ये एका ट्रांसजेंडर जोडप्याने सोमवारी विवाह करत नवा पायंडा पाडला. कोलकात्यामधील LGBT समुहामधील हि पहिली घटना असून तीस्ता दास आणि दीपन चक्रवर्ती या ट्रान्सजेंडर जोडप्याने एप्रिल महिन्यात आपल्या लग्नाची घोषणा केली होती. ३८ वर्षीय तीस्ता कोकाट्यामधील ट्रान्सजेंडर समूहातील लोकप्रिय नाव आहे. त्यांनी टीव्ही आणि अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या असून ४० वर्षीय दीपन हा आसामचा रहिवासी असून मागील काही वर्षांपूर्वी या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी जीवनसाथी बनण्याची घोषणा केली होती.

तीस्ता या पश्चिम बंगालमधील मतदान कार्ड असणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर आहेत. या लग्नाविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि, आम्ही खूप आनंदित आहोत. फक्त आम्हीच नाही तर आम्हाला पाठींबा देणारा प्रत्येक व्यक्ती आंनदी आहे. हा प्रवास सोपा नव्हता. सामाजिक भान जपत आमच्या नात्याला पुढे नेणे आमच्यासाठी फार कठीण होते. त्यामुळे आजचा हा दिवस आमच्यासाठी फार महत्वाचा आणि खास असून आम्ही आमचा साथीदार निवडल्याने फार आंनदी आहोत. दीपनच्या परिवाराने या लग्नापासून दूर राहणे पसंद केले असले तरी तीस्ता यांच्या आई त्यांना मजबूत समर्थन देत असून त्या त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत. तीस्ता यांचा जन्म सुशांतो दास म्हणजेच मुलाच्या रूपात झाला होता. २००४ मध्ये सर्जरी करून त्या ट्रांस-वुमेन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. या दोघांच्या लग्नात कोलकात्यातील अनेक ट्रान्स जेंडर समूहातील लोकांनी सहभाग घेतला होता.

दरम्यान, या लग्नात पश्चिम बंगाल ट्रान्सजेंडर बोर्डाच्या सदस्या रंजिता सिन्हा यांनी देखील सहभाग नोंदविला होता. या लग्नाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की,या संघर्ष समितीच्या तीस्ता या फार काळापासून सदस्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी या व्यक्तींना मिळणारे अधिकार नि याविषयी नागरिकांमध्ये असणारे गैरसमज याविषयी चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांनी हेदेखील म्हटले कि, भारतात अजूनपर्यंत आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराविषयी लोकांमध्ये जागृती नाही तर ट्रान्सजेंडर लोकांच्या समस्या कळण्यासाठी आणि समजावण्यासाठी आम्हाला फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त