Kollam Sudhi Passes Away | साउथ मधील या प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट आणि अभिनेत्याचे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

पोलीसनामा ऑनलाइन – Kollam Sudhi Passes Away | मिमिक्री आर्टिस्ट (Mimicry Artist ) आणि अभिनेता म्हणून सर्वांवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे कोल्लम सुधी (Kollam Sudhi Passes Away) यांचा कार अपघातात (Car Accident) दुर्देवी मृत्यू झाला आहे. कार्यक्रमानंतर परतताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident News) झाला ज्यामध्ये त्यांचा मृत्यू (Kollam Sudhi Death) झाला आहे.

कैपमंगलम (Kaipmangalam) येथे पहाटे ५ च्या सुमारास हा कार अपघात झाला असून यावेळी अभिनेता कोल्लम सुधी (Kollam Sudhi Death) यांच्यासोबत बिनू आदिमाली (Binu Adimali), उल्लास आणि महेश हे तीन मिमिक्री आर्टिस्ट देखील होते. हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अभिनेता कोल्लम सुधी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्य़ान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्या तिघांवरही उपचार सुरु आहे.

कोल्लम सुधी यांनी वयाच्या 39 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. साऊथ इंडस्ट्रीमध्ये (South Industry) त्यांनी खूप नाव कमावले. 2015 साली कोल्लम सुधी यांनी ‘कंथारी (Kanthari)’ या चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. कोल्लम सुधीने ‘कटप्पानायले ऋत्विक रोशन’ (Kattappanayale Rithvik Roshan), ‘कुट्टनादन मारप्पाप्पा’ (Kuttanadan Marappappa), ‘केसू ई वेदिन्ते नाधान (Kesu e Vedinte Nadhan), ‘एस्केप’ (Escape) आणि ‘स्वर्गथिले कत्तुरुम्बु ‘कोल्लम’ (Svargathile Katturumbu Kollam) यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विविध स्टेज शो (Stage Shows) आणि कॉमेडी कार्यक्रमांमुळे (Comedy Shows) त्यांनी अवघ्या काही काळात प्रेक्षकांच्या मनात घर केले. कोल्लम सुधी यांच्या अपघाती निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मिमिक्री आर्टिस्ट कोल्लम सुधी (Kollam Sudhi Passes Away) यांच्या म़ृत्यूची बातमी एएनआयने
ट्विटरच्या माध्यामातून दिली आहे. यावर त्यांच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध अभिनेते अजू वर्गीस (Aju Varghese) व कलाभवन शाजोन (Kalabhavan Shajon) यांनी देखील
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कोल्लम सुधीला श्रद्धांजली वाहिली आहे.

Advt.

Web Title : Kollam Sudhi Passes Away | Mimicry artist Kollam Sudhi dies in road accident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, टीका करताना शरद पवारांचा एकेरी उल्लेख (व्हिडिओ)

Sulochana Latkar Death | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

Gahunje Maval Murder Case | गहुंजेतील सुरज काळभोर खून प्रकरणाला वेगळं वळण, ‘या’ कारणावरून पत्नीनेच ‘गेम’ केल्याचं आलं समोर