कोंढव्यातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

वैद्यकीय व्हिसावर आलेल्या दोघा परदेशी तरुणांच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचा प्रकार कोंढवा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पैशासाठी त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56d86361-a828-11e8-9d65-0b2f77c8bd16′]

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तोगे यांना माहिती मिळाली की, कोंढव्यातील शालीमार इमारतीत परदेशी मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे समजले. त्यांनी ही बाब गुन्हे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांना कळविली. कुंभार यांनी शुक्रवारी एक पथक तयार केले. बनावट गिऱ्हाईकाला संबंधित मोबाईलवर फोन करायला सांगून वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविल्या जात असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांना शालीमार इमारतीत पाठविण्यात आले. बनावट ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी तेथील फ्लॅटवर पोलीस निरीक्षक महादेव कुंभार, सहायक फौजदार देशमुख, हवालदार तोगे, नाईक, थोरात, गावडे, मुकाडे, कोळेकर यांनी छापा टाकला.

या फ्लॅटमध्ये दोन युगांडा येथील महिला आढळून आल्या. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपण ६ महिन्यांपूर्वी वैद्यकीय व्हिसावर भारतात आले आहोत. औषध उपचारासाठी पैश्याची आवश्यकता असल्याने त्यांना वेश्या व्यवसायातून चांगले पैसे मिळू शकतील असे सांगून आमच्याकडून तो वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई वानवडी विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील आणि कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.