कोंढवा दुर्घटना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढवा परीसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करुन त्यात जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली आहे.

कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला. अग्निशामक दलाला ठिगाऱ्यांखालून ३ जणांना जिवंत काढण्यात यश आले आहे. मृतांमध्ये ८ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे.

या दुर्घटनेला बिल्डर आणि महापालिका जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. या दुर्घटनेमुळे कोंढव्यातील बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा

‘अ‍ॅसिडिटीचा’ त्रास टाळण्यासाठी हे उपाय करा, होईल फायदा

घरातल्या या मसाल्याने रात्रीतून पिंपल्स होईल गायब …