Pune Wall Collapse : कोंढवा, आंबेगाव दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळेच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव येथे भिंत कोसळून २१ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंत पडून झालेल्या दुर्घटनेचा अहवाल पुणे महानगरपालिकेला सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार निकृष्ट दर्जाचे बांधकाम, पाणी मुरल्याने आणि झाडांच्या दबावामुळे सीमा भिंत कोसळली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच उर्वरीत भींत पाडून त्याठीकाणी भक्कम भींत बाधण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. हा अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तयार केला आहे.

कोंढव्यातील अल्कॉन स्टायलस सोसायटीची सिमाभींत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला होता. ही घटना २९ जून रोजी घडली होती. तर १ जुलै रोजी सिंहगड कॉलेजची सीमाभींत कोसळून ६ कामगरांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घाटनांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. तसेच या बंधकामांची तपासणी करण्याची विनंती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला करण्यात आली होती. महाविद्यालयाने केलेला तपासणी अहवाल महापौरांना सादर करण्यात आला आहे.

अल्कोन स्टायलस इमारतीच्या सीमाभींतीचे काम निकृष्ट दर्जाचे होते. तसेच सोसायटीच्या आतमधील सिमेंट ब्लॉकमधून पाणी झिरपत होते. सीमाभींतीलगत वाहने लावल्याने दबाव वाढत गेल्याने सीमाभींत मजुरांच्या घरावर कोसळली. उर्वरीत सीमाभींत पाडून त्या ठिकाणी भक्कम सीमाभींत बांधावी, अशी शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

तर सिंहगड कॉलेजच्या सीमाभींतीला जागोजागी तडे गेले आहेत. तसेच महाविद्यालयाची इमारत आणि सीमाभींती दरम्यान बांधलेल्या वर्कशॉपच्या छतावर पावसाचे पाणी साठत होते. हे पाणी भींतीजवळ पडत असल्याने त्या ठिकाणी झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे पाणी मुरत होते. मातीचा दबाव वाढल्याने भींत कोसळल्याचे अहवालात म्हटले आहे. सीओएपीचे तज्ज्ञ डॉ. एम. एस. रणदिवे, डॉ. आर. एस. दळवी आणि डॉ. आय. पी. सोनार यांनी घटनास्थळाची पाहणी करून अहवाल तयार केला.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

Loading...
You might also like