Pune : सराईत गुन्हेगारांच्या खुनातील दोघांना 24 तासात अटक, कोंढवा पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पूर्ववैमनस्यातून कारागृहातून जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगार सागर अवताडे यांच्यावर वार करुन खुन करणार्‍या दोघांना कोंढवा पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली.

नारायण ऊर्फ माया विश्वनाथ पुरी (वय २५, रा. हांडेवाडी, मुळगाव परभणी), जुनेद नसीर शेख (वय २०, रा. सैय्यदनगर, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावेआहेत.सागर दादा आवताडे (वय २३, रा. औताडेवाडी) याची व नारायण पुरी यांच्या एक वर्षांपूर्वी भांडणे झाली होती.त्यावेळी सागर याने पुरी याला कानिफनाथाच्या डोंगरावर नेऊन मारहाण केली होती. त्यामुळे पुरी याच्यामनात राग होता. सागर हाही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला नुकताच जामीन मिळाला होता. २६ सप्टेंबर रोजी तो आपली दुचाकी सर्व्हिसिंग करण्यासाठी बालाजी गॅरेजमध्ये घेऊन आला होता. त्यावेळी कारमधून तिघे जण आले व त्यांनी धारधार हत्याराने सागरच्या अंगावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला.

पोलीस शिपाई आझीम शेख, पृथ्वीराज पांडुळे, दीपक क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, आरोपी हे मंहमंदवाडी येथे लपून बसले आहे. या माहितीवरुन पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी जुन्या वैमनस्यातून खुन केल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, सुनिल कलगुटकर, वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहायक फौजदार इक्बाल शेख, सुरेश भापकर, सुशील धिवार हवालदार योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, कौस्तुभ जाधव, तनावडे , दीपक क्षीरसागर, आझीम शेख, किरण मोरे,मोहन मिसाळ उमाकांत स्वामी यांनी ही कामगिरी केली.

पोलीस आयुक्तांकडून कौतुक
नुतन पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता हे सध्या शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देत आहेत. रविवारी त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या खुनाच्या गुन्ह्यात खुन झालेल्या सराईत गुन्हेगाराचे आतापर्यंतचे गुन्हे व त्याला तडीपार करण्यासंबंधिताचा प्रस्ताव याची फाईल गायकवाड यांनी आयुक्तांसमोर ठेवली. हा प्रस्ताव पाहिल्यावर तुम्ही सर्व काही तयार करुन ठेवले होते, असे म्हणून गुप्ता यांनी कोंढवा पोलिसांचे कौतुक केले.